दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनीधी): सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): वनपरीक्षेञ पाटोदा अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या वन गुन्हा क्र. WL-02/2025 मधीलआरोपी खोक्या ऊर्फ सतिष भोसले याला वन विभागाने चौकशी कामी गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी मा. न्यायालय शिरुर कासार यांच्या हस्तांतर वॉरंट आदेशान्वये जिल्हा कारागृह बीड येथुन सकाळी ताब्यात घेवुन आरोपीची जिल्हा रुग्णालय बीड येथे सकाळी 11.45 वा. वैद्यकिय तपासणी करण्यात आली. सदर आरोपीच्या पत्नीस आरोपीच्या अटके बाबत माहीती देवुन आरोपी सतिश भोसले यास पुढील तपास कामी वनपरीक्षेञ पाटोदा येथे घेवुन जाण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 5.25 वा. मा. न्यायालय शिरुर कासार येथे हजर करण्सात आले. परंतु वन विभागाच्या अधिकार्यांनी चौकशी दरम्यान आपल्याला मारहाण केली अशी तक्रार मा. न्यायालयाकडे केली. यावरुन मा. न्यायालयाच्या आदेशाने आरोपीची वैद्यकिय तपासणी करुन 8.30 वा. पुन:श्च मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले. वैद्यकिय तपासणीच्या अहवालावरुन आरोपी सतिश भोसले याला कोणतीही मारहाण झाली नसल्याबाबतचे निरीक्षण नोंद करुन सदर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या वरुन खोक्या ऊर्फ सतिश भोसले याने वन अधिकारी यांनी चौकशी दरम्यान आपल्याला मारहाण केल्याबबतची तक्रार खोटी असल्याचे स्पष्ट झाले. या नंतर सदर आरोपीला जिल्हा रुग्णालय बीड येथे राञी 10.30 वा. पुन:श्च वैद्यकिय तपासणी करुन राञी 11.35 वा. जिल्हा कारागृह बीड येथे दाखल करण्यात आले. सदर प्रकरणी प्रसार माध्यमांनी दाखवलेल्या आरोपी सतिश भोसले यास चौकशी दरम्यान मारहाण झाल्याबाबतच्या आरोपाचे वन विभागाने पुर्णपणे खंडन केले आहे.