दैनिक चालू वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील यशवंत विद्यालयात शिक्षणाचे खरेखोरे प्रणेते क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न करण्यात आला
प्रारंभी प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उप मुख्याध्यापक माधव वाघमारे पर्यवेक्षक राम तत्तापूरे, शिवाजी सूर्यवंशी, सुनील धनुरे प्रतिभा सोलपुरे, रोहन बिराजदार यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन गुरप्पा बावगे यांनी तर आभार गहिनीनाथ क्षीरसागर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.