
मैथरी मूवी मेकर्स निर्मित ‘जाट’ चित्रपट सिंगल स्क्रीनवर रिलीज होताच धुमाकूळ घालत आहे. जवळपास १४ हजार ते १७ हजार तिकिटांचे ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे.
याआधी मल्टीप्लेक्स नॅशनल चेन्समध्ये जवळपास २० हजार तिकीट विक्री करून पहिल्या दिवशी प्री-सेल पूर्ण केलं होतं. आता वीकेंडला चित्रपटाची कशी जादू चालते, हे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आल्यानंतर समजणार आहे.
‘जाट’ चित्रपटात सनी देओल आणि रणदीप हुड्डाच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहेय ९.५० कोटींचे कलेक्शन करत सनी देओलच्या करिअरची सेकंड हाएस्ट ओपनिंग चित्रपट बनला.
जाट’ चित्रपट ठरला सर्वात मोठा ओपनर
जाट चित्रपटाचे ओपनिंग दमदरा ठरले. २०२५ मधील तब्बल १० चित्रपटांच्या ओपनिंग कलेक्शनवर जाटने मात केलीय. यावर्षी रिलीज झालेला छावा, सिकंदर, स्काय फोर्स सोडून आजाद, इमरजन्सी, देवा, बॅडऐस रविकुमार, सनम तेरी कसम री-रिलीज, क्रेजी, द डिप्लोमॅट, लवयापा, फतेह, मेरे हसबैंड की बीवी यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.