
प्रत्येक शेअरवर…
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच मोनाच नेटवर्थ कॅपिटल, नुवामा, एसएमआयएफएस, एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस, व्हेंचुरा सिक्युरिटीज आणि आदित्य बिर्ला मनी यांसारख्या ब्रोकरेजनी काही स्टॉकवर त्यांचे रिपोर्ट्स सादर केले आहेत.
त्यात आता TATA च्या कंपनीला 12224 कोटींचा नफा झाल्याचे पाहिला मिळाले.
सर्व स्टॉकना ‘बाय’ किंवा बाय रेटिंग दिले आहे. या ब्रोकरेज फर्म्सच्या मते, हे स्टॉक 55 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. भारतातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वर्षानुवर्षे 1.68 टक्क्यांनी कमी होऊन 12224 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला 12502 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीच्या नफ्यात झालेली थोडीशी घट जागतिक अस्थिरतेमुळे आहे.
अमेरिकेने लादलेले आणि नंतर मागे घेतलेल्या शुल्कामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर अनिश्चितता निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत टीसीएसचे चौथ्या तिमाहीचे निकाल आले आहेत. आयटी कंपन्यांच्या तिमाही निकालांची घोषणा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसपासून सुरू होते.
प्रति शेअर 30 रुपयांचा लाभांश
टीसीएसने सांगितले की, प्रति शेअर 30 रुपये लाभांश जाहीर केला आहे. याशिवाय, कंपनीने आर्थिक वर्षात अंतरिम आणि विशेष लाभांशासह एकूण 96 रुपये लाभांश जाहीर केला आहे.