
मुलाला पत्नीकडं द्यायला सांगितलं आणि धाडधाड गोळ्या झाडल्या !
जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात एकूण २८ भारतीयांना जीवाला मुकावे लागले. या भीषण हल्ल्यात बंगळूरूतील ४१ वर्षीय अभियंता भारत भूषण यांचाही मृत्यू झाला आहे. २२ एप्रिलला भारत आपल्या पत्नी आणि मुलांसोबत पहलगाममध्ये फिरायला गेले होते.
त्याठिकाणी काही दहशतवादी आले आणि त्यांनी भारतला घेरलं. दहशतवाद्यांनी त्यांना विचारलं आणि भारत हे नाव ऐकताच दहशतवाद्यांनी धडाधड गोळ्या झाडल्या. पत्नी आणि मुलांसमोरच त्यांचा मृत्यू झाला.
हिंदू आहात का? अन् नंतर गोळ्यांचा वर्षाव
जावयाचा मृत्यू हल्ल्यात झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या सासूबाईंनी मीडियाशी बोलताना सांगितले की, दहशतवाद्यांनी आधी भारतला थांबवलं. त्याला घेरलं. नंतर त्याला ‘तुझं नाव काय? तुझं धर्म काय?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा भारतने, ‘माझं नाव भारत आणि मी हिंदू आहे’, असं त्याने उत्तर दिलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी भारतवर गोळ्यांचा भडिमार सुरू केला. जमिनीवर कोसळेपर्यंत दहशतवादी गोळीबार करत राहिले.
पत्नीवर दुखा:चा डोंगर
भारतची पत्नी सुजाता या डॉक्टर आहेत. त्यावेळी सुजाताने आपल्या मुलाचे प्राण वाचवणे उचित समजले. त्यांनी पर्स, मोबाईल आणि मुलाला घेऊन तातडीने तेथून पळ काढला. भारतीय सैन्याने तिला आणि तिच्या मुलाला तातडीने सुरक्षितस्थळी पोहोचवले.
कुटुंबावर दुखा:चा डोंगर
भारत भूषण हे मुळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी. ते आपल्या कुटु्ंबासोबत बंगळूरूच्या मट्टीकेरे भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. सुट्टीसाठी ते आपल्या कुटुंबासोबत पत्नी आणि मुलासह काश्मीरला गेले होते. दरम्यान, हसत खेळत पार पडणारी सुट्टी एका रक्तरंजित थरारामध्ये बदलेल याची कल्पना कुणालाही नव्हती.