
दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी-प्रा विजय गेंड
माळशिरस प्रतिनिधी
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालून लाखो वैष्णव भक्तांसह पालखी सोहळा पुणे जिल्यातील इंदापूर तालुक्यातील सराटीतून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून अकलूज या ठिकाणी मुक्कामी विसावला.
तुकाराम महाराजांच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर वाजत गाजत या पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती. गोल रिंगण 1 जुलै रोजी अकलूज सदाशिवराव माने विद्यालयात पार पडले.
या सोहळ्यासाठी अकलूज नगरी सज्ज झाली होती तसेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी अकलूजचे प्रांताधिकारी तसेच माळशिरसचे तहसीलदार, अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री दयानंद गोरे व आरोग्य विभाग व प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तयारी केली होती.