
स्वबळावर लढण्यावर बाळा नांदगावकर स्पष्ट म्हटले; एकट्याने…
उद्धव ठाकरे-राज ठाकरे पाच जुलैला मराठीच्या मुद्यावर एकाच मंचावर आले. त्यानंतर मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती झाली पाहिजे, असे उघडपणे म्हणत आहेत.
संजय राऊत यांनी दोन्ही भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येतील, असे सांगितले. मात्र, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या वेळ आली तर एकट्याने लढू, असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
बाळा नांदगावकर म्हणाले, ‘प्रत्येकजण आपआपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्या पक्षाला महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत कसे यश मिळेल हे पाहत असतो असो. आत्तापर्यंत आम्ही एकट्याने लढलो आहोत आणि वेळ आली तर एकटं लढू,
मराठीच्या मुद्दायवर ठाकरे बंधू एकत्र आले एकत्र राहायचे की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे कोणतीही तडजोड करीत नाहीत. त्यांनी हा विषय लावून धरला. पालिका निवडणुका हा विषय नव्हता. इतर राजकीय पक्षांपेक्षा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर भाजपकडूनच अधिक बोलले जाते, असा टोला देखील नांदगावकर यांनी लगावला.
राज ठाकरे काय निर्णय घेणार?
मनसेचे आजापासून नाशिकमधील इगतपूरीमध्ये तीन दिवशीय शिबिर होत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण मानले जात आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढायची की उद्धव ठाकरेंसोबत युती करायची याचा निर्णय या शिबिरात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिबिरात राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे मनसे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.