
मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावर जरांगे तळ ठोकणार…
आज 27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीहून मुंबईकडे निघाले आहेत. त्यांनी गणपती बाप्पाची आरती केली, त्यानंतर पूजा करून आशीर्वाद घेत आपल्या मराठा बांधवांना एकत्रित केलं आणि मुंबईकडे कूच केली.
मात्र, मनोज जरागेंना आझाद मैदानावर उपोषण करू दिलं जाणार नाही असा मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय जारी केला होता. मात्र, आता तो निर्णय मागे घेत महत्वाची अपडेट समोर आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरागेंना आझाद मैदानावर एकच दिवस उपोषण करता येईल असा निर्णय दिला. तसेच आझाद मैदानावर एकूण 5 हजार लोक आंदोलनादरम्यान उपस्थित राहतील, असे देखील न्यायालयाने सांगितले. सध्या देशभरात गणेशोत्सव आहे. मुंबईतील गणेशोत्सवाची जगभर चर्चा आहे. यामुळे मुंबईत गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ही एकूण परिस्थिती पाहता एकूण 5 हजार मराठा बांधव आझाद मैदानावर आंदोलनासाठी येऊ शकतात. इतरांना येता येणार नाही, करण आझाद मैदानावर 5 हजार लोक बसतील तेवढीच मैदानाची कपॅसिटी आहे.
एक दिवस आझाद मैदानावर उपोषण करता येणार
तसेच विनिर्देशित ठिकाणी आंदोलन केलं जाऊ नये. तसेच ध्वनिक्षेपक, आवाज करणाऱ्या उपकरणांचा आंदोलनादरम्यान वापर करू नये. यासाठी आंदोलनाची वेळही ठरवून देण्यात आली आहे. सकाळी 9:00 वाजता आंदोलनास सुरुवात करावी ते सायंकाळी 6 नंतर आंदोलन करता येणार नाही. ठरवून दिलेल्या वेळेतच आंदोलन करावं, त्यानंतर आंदोलनासाठी मैदानात थांबता येणार नाही. या ठिकाणी आंदोलकांना कसलाही केर – कचरा टाकू नये.
एवढंच नाही,तर सध्या मुंबईत गणेशोत्सव असल्याने त्याही बाबी लक्षात घ्याव्यात. या कालावधीत मुंबई भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बाप्पाच्या विसर्जनावेळी मुंबईच्या रस्त्यावर तोबा गर्दी असते ही बाब लक्षात ठेवावी. तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखू नये याचे गांभीर्य ठेवावे. आंदोलनात लहान मुलं, गरोदर स्त्रिया आणि वृद्ध व्यक्तींचा सहभाग करून घेतात जाणार नाही असे सांगितले.