
लोकसभा पाटोपाठ विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर नाराज झालेल्या प्रदेशाध्यक्ष डॉ. जालिंदर पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान राखण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यावर दिसणाऱ्या प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांना शिवसेनेच्या शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले आहे. तर सचिवपदी जनार्दन गुंडू पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेनेच्या बैठकीत महाराष्ट्रातील सात सदस्यांची निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्या आहेत.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चळवळीत काम करणाऱ्यां प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी महाराष्ट्र राज्य शिवसेना शेतकरी सेनेची स्थापना केली. या शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा. डॉ. जालंदर पाटील यांची तर शेतकरी सेनेच्या सचिवपदी जनार्दन पाटील (परीते, ता. करवीर) यांची निवड करण्यात आली.
चळवळीत काम करत असताना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर भांडणे एवढेच हातात होते. मात्र धोरण नीतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो या भावनेतून प्रदेशाध्यक्षपद स्विकारले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध पिकांच्या माध्यमातून अनेक प्रश्न आज उभे आहेत. शासन धोरण राबवत असताना त्या प्रक्रियेत राहून शेतकरी हिताचे निर्णय घेता येतील.
या निवडीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, मंत्री उदय सामंत , खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सदाभाऊ खोत, आमदार राजेश क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : प्रा. जालंदर गणपती पाटील (प्रदेशाध्यक्ष : राशिवडे बुद्रुक जि. कोल्हापूर ), धनंजय भास्कर जाधव (कार्याध्यक्ष : पुणतांबा ‘ आहिल्यानगर ) ‘ नाथराव निवृत्तीराव कराड ( उपाध्यक्ष : हिंजेगाव जि. बीड ), रवींद्र बापूसो मोरे : उपाध्यक्ष टाकळीमिया ‘ अहिल्यानगर ), प्रा. विश्वंभर सोपान बाबर (उपाध्यक्ष म्हसवड जि. सातारा ), जनार्दन गुंडू पाटील (सचिव :परिते जी. कोल्हापूर ) पद्माकर एकनाथ मोराडे ( खजिनदार : मसरूळ जि. नाशिक ), प्रल्हाद रामजी इंगवले, सरचिटणीस : मालेगाव जि.नांदेड )