इगतपुरी प्रतिनिधी : विकास पुणेकर
इगतपुरी :- इगतपुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडल्यानंतर इगतपुरी शहर स्वच्छ, सुंदर व नागरिकाभिमुख बनविण्याच्या उद्देशाने इगतपुरी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक नागरिकांच्या समस्या निवारणासाठी जोमाने काम करत आहेत. रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा, गटारी व नाल्यांची साफसफाई, शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा पाईपलाईन लिकेज, आरोग्यविषयक प्रश्न,पथदीप समस्या, पाण्याचा तुटवडा तसेच घरकुल योजनेशी संबंधित अडचणी अशा सर्व प्रश्नांवर नगरपरिषदेने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. अनेक वर्षांनंतर इगतपुरी शहरात प्रत्यक्ष विकासकामे दिसू लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या कार्याबद्दल जनतेकडून जाहीर आभार व्यक्त केले जात आहेत.
पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त लिकेज तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यावर प्रभावी निवारण करण्यात आले आहे.
▪️ बारा बंगला रोडवरील पाईपलाईन लिकेज दुरुस्ती
▪️ तळेगाव येथील ३ इंच PVC पाईप लाईन लिकेज बंद
▪️ टिकापुरी येथील ४ इंच पाईप लाईन तुटलेली जोडणी दुरुस्त
▪️ भजनी मठ – अरब मस्जिद परिसरातील तुटलेली तीन नळ कनेक्शन लिकेज बंद
▪️ कथुरवगन येथील ३ इंच पाईप लाईन लिकेज दुरुस्त
▪️ तळेगाव येथे दोन ठिकाणी तुटलेली ४ इंच पाईप लाईनची जोडणी पूर्ण
तसेच गवळी देवाची वाडी (तळेगाव) येथे नगरसेविका सौ. ललिता नामदेव लोहरे व नामदेव लोहरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिसरात पथदिवे नसणे, ६ ते ७ नवीन लाईट बसविण्याची आवश्यकता, पाणीपुरवठा होत नसणे तसेच पाण्याचे कोणतेही ठराविक वेळापत्रक नसणे आदी प्रश्नांवर लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.
खालची पेठ येथे रस्त्यांच्या दुतर्फ साचलेला कचरा सफाई करण्यात येऊन विल्हेवाट लावण्यात आली,तुंबलेले नाले, गटारी साफ करण्यात आल्या.
अशा प्रकारे इगतपुरी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. शालिनी खातळे, उपनगराध्यक्ष मंगेश खातळे, गटनेते फिरोज पठाण, उमेश कस्तुरे, तसेच नगरसेवक युवराज भोंडवे, राजेंद्र जावरे, सागर आढार, सतिश मनोहर, रोहिदास डावखर, भूषण जाधव तसेच महिला नगरसेविका भारती शिरोळे, निकत सय्यद, आशा थोरात, वैशाली कर्पे, नाजनीन खान, मयुरी बेदरकर, माला गवळे, ललिता लोहरे, आशा भडांगे, अंजुम कुरेशी यांच्या सक्रिय सहभागातून शहरातील विविध मूलभूत सुविधांची कामे वेगाने सुरू असून, इगतपुरी शहर विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
