प्रतिनिधी – उमरगा -महेश चंद्रकांत पाटील
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काही दिवसांवर येऊन थांबले असताना. गुंजोटी गावातून राजकीय तर्क वितर्क लागत असताना अचानक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून माजी ग्रामपंचायत सदस्य गुंजोटी तथा चेअरमन सौरभ मजूर सहकारी सोसायटी गुंजोटीच्या सौ. दिपाली शिवाजीराव गायकवाड ह्या गुंजोटी पंचायत समिती साठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्या परीने त्यांनी आपली तयारी चालू करून जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचे सूक्ष्म नियोजन करत आहेत सौ. दिपाली शिवाजीराव गायकवाड ह्या गुंजोटी चे माजी उपसरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष व काँग्रेस तालुका सचिव शिवाजीराव गायकवाड यांच्या पत्नी आहेत. शिवाजीराव गायकवाड हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि ते आश्लेष भैया मोरे यांचे जवळचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यातच त्यांची जमेची बाजू म्हणजे सर्व काँग्रेसला सोडून जात असताना त्यांनी आपली एक निष्ठा सिद्ध केलेली आहे. शिवाजीराव गायकवाड हे नावच त्यांच्या विजयाची नांदी आहे. कारण गायकवाड हे गोरगरीब लोकांचे कैवारी म्हणून उमरगा परिसरात परिचित आहेत. त्यांना वगळून गुंजोटी पंचायत समितीचे सूत्र जुलु शकत नाही यात तीळमात्र शंका नाही शिवाजीराव गायकवाड यांच्या माध्यमातून गावात बरीच विकास कामे झाली आहेत त्याला गुंजोटीकर नाकारू शकत नाहीत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत आणि त्या पुढील उमेदवाराला जशास तसे तुलनेत लढत देतील. शिवाजीराव गायकवाड राजकारणात गेली 25-30 वर्ष आपले सर्वस्व अर्पण करून गावच्या विकासासाठी झटत आहेत तर त्यांना वरिष्ठाकडून नक्कीच संधी मिळेल अशी आशा गुंजोटी वाशियाकडून आहे आणि त्यांना गुंजोटीकर नक्की साथ देतील शिवाजी गायकवाड यांना गुंजोटी गावात गोरगरिबांच्या कैवारी म्हणून ओळख आहे. काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या पत्नीचा नक्कीच विचार व्हावा अशी इच्छा सामान्य कार्यकर्त्यातून करण्यात येत आहे.
