दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
मकर संक्रांतीच्या सणासाठी महिलांनी देगलूर बाजारात गर्दी केली, मात्र वस्तूंच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाईचे सावट दिसून आले. ‘तिळगुळ घ्या गोडगोड बोला’ या संदेशासह सण साजरा केला जात आहे.
तिळगुळ घ्या गोडगोड बोला चा संदेश देणारा नवीन
वर्षातील पहिली मकर संकांत बुधवारी आहे. या मकर संक्रांतीच्या सणासाठी तिळगुळ, हळदी-कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदी साठी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने देगलूर शहरांसह ग्रामीण भागातील महिलांनी बाजार पेठेत एकच गर्दी केली होती. यंदा प्रत्येक वस्तूच्या दरात वाढ झाल्याने मकर संक्रांतीच्या सणावर महागाईचे सावट असल्याचे चित्र दिसून आले.भारतीय परंपरेतील अनन्य साधारण महत्व असलेला महिलांचा मकर संक्रांतीचा सण बुधवारी साजरा होत आहे. तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकरसंक्रांत. या दिवशी ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेश देत प्रेम, आपलुकी शिवाय एकमेकां विषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा आहे.
मकरसंक्रांती निमित्ताने कापड बाजारात महिलांनी साडी खरेदीसाठी अलोट गर्दी केली काही कापड दुकानांमध्ये संक्रांत निमित्य एक साडीवर एक साडी फ्री अशी ऑफर महिलांना आकर्षित करत असल्याचे दिसून आले तसेच अनुप विजया साडी सेंटर येथे खेळ पैठणीचा सन्मान लाडक्या बहिणीचा असा कुठेतरी साडी खरेदीसाठी महिलांना ऑफर देण्यात आली .त्याच बरोबर विविध प्रकारचे वाण, तिळगुळाचे लाडू बाजार पेठेत विक्रीला आले आहे. त्या सोबतच तयार तीळगूळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या तसेच गुळाची रेवडी, हलवा, लहान सुपाऱ्या, हरभराढाळा, आमटीची भाजी या वस्तुंची खरेदी जोमात सुरु आहे. हळदी कुंकवाचे वाण व लुटण्यासाठी विविध आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी शहरातील लोहिया मैदान ,जुना सराफा, नागोबा मंदिर इथे विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्याने वर्दळ वाढली असल्याचे दिसून आले.चमचे, वाटी, सोप केस, डबे, कुंकवाचा कंरडा अशा रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तूची खेरदी मोठ्या प्रमाणात होत आहे. सुवासिनींचा मकरसंक्रात हा महत्त्वाचा सण असल्याने या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे वाण खरेदी साठी व तिळगुळ वाटण्यासाठी व ओवसण्यासाठी खणाची आवश्यकता असल्याने ते खरेदीसाठी गर्दी होत आहे.
दरम्यान, सर्वच प्रकारचे साहित्य महागले असले तरी खरेदीसाठी बाजारात महिलांचा उत्साह दिसुन आला.
मकरसंक्रांतीच्या सणासाठी महिलांची साडी खरेदी जोमात सुरू आहे, ज्यात काळ्या रंगाच्या साड्यांना विशेष महत्त्व आहे, कारण तो थंडीत उष्णता शोषून घेतो आणि वाईट शक्तींपासून रक्षण करतो, तसेच पैठणी, सिल्क यांसारख्या पारंपरिक आणि आकर्षक डिझाइनच्या साड्यांना मागणी आहे,…
अविनाश कोडगिरे
कापड व्यापारी देगलूर
