दैनिक चालू वार्ता संभाजीनगर प्रतिनिधी-पंडोरे शितल रमेश
==========================
संभाजीनगर:-डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा विद्यापीठ च्या वतीने नाट्यगृहात मंगळवारी दि.६ डिसेंम्बर २०२२ सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम झाला आणि मराठवाडा विद्यापीठ च्या गेट जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर च्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कारून सर्व रहिवाशांनि महाआभिवादन केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते दलितांचे उद्धारदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B,R Ambedkar) यांचा आज (६ डिसेंबर) ६६ वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. ६ डिसेंबर १९५६ दिवशी बाबासाहेबांनी दिल्ली मध्ये अखेरचा श्वास घेतला होता. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत देशभरातील आंबेडकर जनता, बौद्ध धर्मीय तसेच भीम अनुयायी दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर येऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतात. भारतीय समाजातील जातीव्यवस्थेतील त्रृटी समोर आणत आंबेडकरांनी दलित, अस्पृश्य समजल्या जाणार्यांना आधार दिला. बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याची शिकवण पुन्हा समाजात पसरवण्याचं काम विविध मार्गांनी केलं. सोबतच मागास राहिलेल्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. कुलगुरू मा प्रा डॉ प्रमोद येवले अध्यक्ष स्थानि होते .प्रकुलगुरु डॉ . शाम शिरसाठ कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांची उपस्थिती होती .या वेळी डॉ ऋषिकेश कांबळे म्हणाले , जो पाहिल्यादा जात मानत नाही तो आंबेडकर वादी असतो. जो जात मानतो , त्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे अवघड आहे .पूर्वी शाळेतील अभ्यास क्रमात थोरांची ओळख ही पुस्तक अभ्यासले ,त्या काळातील शिक्षण कानी शिकवले . की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी होते तथापि पुढे बाबासाहेबांचा विविध अंगांनी अभ्यास झाला . आणि कळले की ते केवळ दलितांचे नव्हे तर समस्त बहुजनांचे ,देशाचे ते नेते आहेत. छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव येथे बहिष्कृत ची परिषद भरली होती त्या परिषदेत महाराजांनी भाकित केले होते की डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनाचे नेते होतील ते पुढे खरे ठरले . बाबासाहेबानी मानव मुक्ती च्या चळवळी ला सुरवात केली . तेव्हा त्यांच्या सोबत स्वजातीपेक्षा ही अन्य समाजातील लोक मोठया संख्येने सहभागी झाले . होते ओ बी सी ,एस बी सी हे शब्दप्रयोग पहिल्यांदा बाबासाहेबांनी च वापरात आणले . गौतम बुद्धांनंतर असंख्य लाटा आल्या,पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व सामाजीक परिवर्तन घडवून आणले.,हीच मोठी लाट ठरली . त्या काळी आपला भूगोल फक्त दोघाना नीटपणे माहित होतं,जे म्हणजे डॉ बाबासाहेब आणि महात्मा गांधी. त्यांना सर्व अखंड भारतातील सर्व जाती धर्म माहीत ,जे ७ धर्म २५ पंथ ८ हजार जाती १६ भाषा आहेत. ज्या डॉ बाबासाहेब ना माहिती होत्या .बाबासाहेबांची अजून काही संकल्प अपूरे आहेत ,महात्मा फुले शिक्षणाच्या वाती पेटविल्या ,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या . भारतीयांनी धर्माचा, जाति चा ,भाषेचा अहंकार न बाळगता राष्ट्रप्रेम जतन करावे. बाबासाहेबांनी संगीतलेल्या वाटेने जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, असेही डॉ कांबळे म्हणाले ,सुमारे सव्वातासाच्या व्याख्यानात डॉ कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्राच्या जडणघडनित योगदान सौदाहरण विशद केले.
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संभाजीनगर येतील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,येथे महामानवास महाआभिवादन मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आले आहे
