दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा.दवणे..
मंठा पी.सी.एम पत्रकार संघ मुंबईच्या मंठा तालुकाध्यक्षपदी आशिष तिवारी तर उपाध्यक्षपदी रविंद्र भावसार व सचिवपदी शेख अशपाक यांच्या निवडीची घोषणा पी.सी.एम संघ जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी केली. यावेळी जालना जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी मोरेश्वर बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली. (ता. ०४) जानेवारी बुधवार रोजी जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी लक्ष्मण सोळुंके मनोज कोलते दर्पण जैन व गणेश काबरा यांची उपस्थिती होती.
यावेळी निवड करण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे सल्लागार दैनिक लोकमत समाचारचे जेष्ठ पत्रकार हरिराम तिवारी, दैनिक दिव्य मराठीचे प्रदीप देशमुख, उपाध्यक्षपदी रविंद्र भावसार, गजानन माळकर, कोषाध्यक्ष सचिन नरवाडे, कार्यकारणी सदस्य योगेश गणगे, मुरलीधर बिडवे, सुभाष वायाळ, जीवन काळे, सुरेश दवणे, स्नेहल हिवाळे, बाबासाहेब खराबे, दत्ता खरात, गणेश खराबे, ज्ञानेश्वर नेवरे, प्रकाश जाधव, नवनाथ चट्टे, सोनाजी जाधव यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकारयांचा श्री शेळके व अन्य मान्यवरांनी यथोचित सत्कार करून सेवा कार्य निस्वार्थता व जिद्दीने करण्याच्या शुभेच्छा उपस्थित ता अध्यक्ष आणि पदाधिकाऱयांना दिल्या
