अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट रास्ता रोको आंदोलन करणार…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – लोहा कंधार तालुक्यातील चिञ पहाता अनेक गावांमध्ये मोठा पाऊस झालेला नाही तर अनेक ठिकाणी काही भागातील नदी , नाले , विहीर या कोरड्याच आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी अल्प पावसावर पेरण्या केल्या हजारो रुपये खर्च करून बी-बियाणे, खते विकत घेतली. पिकेही चांगली बहरली, त्यावर पुन्हा किटकनाशके फवारणी केली, अतिशय कष्टाने पिकांचे संगोपन केले. पण लोहा – कंधार तालुक्यात, दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
लोहा कंधार तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाकडे लोहा कंधारचा अहवाल पाठवावा आणि तात्काळ यावर निर्णय शासनाने घ्यावा यासाठी योग्य असा अहवाल शासन दरबारी सादर करून लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांवर दोन ते तिन वेळा पेरण्या करूनही शेतकऱ्यांच्या पिकांची दैनिय अवस्था झाली असुन सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत करावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते बाळासाहेब पाटील जाधव सुनेगावकर सह युवासेना विधानसभा प्रमुख बालाजी गाडेकर, युवानेते बालाजी पाटील कदम, श्रीकांत पाटील पवार, योगेश पाटील सह आदिंनी मागणी लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाच्या वतीने लोहा कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळी मदत जाहीर न झाल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दि २२ – ०८ – २०२३ मंगळवारी लोहा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेनेचे युवा नेते बाळासाहेब पाटील जाधव यांनी यावेळी दिली.
