दै.चालु वार्ता
अंबाजोगाई बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
बालगोपाळांना खेळण्यासाठी मिळणार लवकरच अद्यायवत उद्यान मिळणार आहे…
अंबाजोगाई येथील मागील अनेक वर्षापासूनची अंबाजोगाईकरांसाठी जिव्हाळ्याचा असलेला सार्वजनिक उद्यानाचा प्रश्न आ. नमिता मुंदडा यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. आ. मुंदडा यांच्या प्रयत्नांनंतर नगर परिषदेच्या योगेश्वरी उद्यानाच्या नूतनीकरणाची निविदा प्रक्रिया सुरु झाली असल्याने लवकरच शहरातील बालगोपाळ आणि आबालवृद्धांसाठी सुसज्ज आणि अद्ययावत उद्यान उपलब्ध होणार आहे. तसेच, श्री योगेश्वरी मंदिर जवळच्या उद्यानाच्या नूतनीकरणासाठी देखील आ. मुंदडा यांचे प्रयत्न सुरु आहेत. शांत आणि सुसंस्कृत वातावरणामुळे अंबाजोगाईतील लोकसंख्या झपाटयाने वाढत गेली, शहर विस्तारले मात्र, वाढत्या शहराच्या तुलनेत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. हि बाब जाणून आ. नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाईकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अंबाजोगाईत सध्या जवळपास दीडशे कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यासोबतच शहरातील पाणीपुरवठा, घरकुले, स्मशानभूमी, क्रीडासंकुल आदीमध्ये सुधारणा करण्यासाठी आ. मुंदडा यांचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, अंबाजोगाईत मुख्य रस्त्यावरील योगेश्वरी उद्यान आणि श्री योगेश्वरी मंदिराजवळील उद्यान अशी दोन उद्याने आहेत.
*एकेकाळी या दोन्हीठिकाणी बालगोपाळांची आणि पालकांची मोठी गर्दी असायची*. मात्र, प्रचंड दुरावस्थेमुळे सध्या या दोन्ही उद्यानांचा लहान मुले आणि नागरिकांसाठी कसलाही उपयोग नाही. तुटलेल्या धोकादायक झालेल्या खेळण्या, जीर्ण बाकडे, वाळलेले गवत, फुलझाडे, बंद पडलेले कारंजे | यामुळे या उद्यानांकडे नागरिकांनी पाठ फिरवली. लहान मुलांना बागडण्यासाठी हक्काचे उद्यान राहिले नाही. त्यामुळे | उद्यानांचे नूतनीकरण करावे अशी मागणी अनेक वर्षापासून नागरीकातून होत आहे. नागरिकांच्या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी आ. मुंदडा यांनी उद्यानांच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न सुरु केले. नूतन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे अंबाजोगाई नगर परिषदेत रुजू होताच त्यांनी आ. मुंदडांच्या सूचनेवरून दोन्ही उद्यानाची पाहणी केली. त्यानंतर सर्वप्रथम योगेश्वरी उद्यानाच्या नूतनीकरणासाठीच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे उद्यानात नवीन खेळणीसह इतर दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे अंबाजोगाईतील बालगोपाळांना खेळण्यासाठी मिळणार लवकरच अद्यायवत उद्यान मिळणार आहे. तर, मंदिरा जवळील उद्यान नूतनीकरण प्रक्रियेस देखील काही दिवसात सुरुवात करण्यात येणार आहे. आ. नमिता मुंदडा यांनी उद्यान नूतनीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
