
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील हणेगाव लगत असलेल्या शिळवणी शिवारात शेतात एकटी असल्याचे दिसून येताच संधीचा फायदा घेत रविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोजी दुपारच्या सुमारास जबरीने २९ वर्षीय विवाहित महिलेवर एक मुख्याध्यापक असलेल्या जबाबदार व्यक्तीने जबरी बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
शिळवणी येथील २९ वर्षीय विवाहित महिला ही गावातील नागेंद्र हडोळे यांचे मालकीच्या असलेल्या लावण केलेल्या शेतात रविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोजी तुरीचे सरवा वेचण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास शेताकडे गेली होती. दरम्यान दुपारी एकच्या सुमारास शेताच्या शेजारी शेत असलेल्या व शिळवणी येथील व्यंकटराव
देशमुख विद्यालयात मुख्याध्यापक असलेल्या गंगाधर पांढरे हा शेतात येऊन महिलेसोबत अश्लील चाळे करत मला तुझ्यासोबत झोपायचे आहे म्हणून झटापट केली.
या महिलेने विरोध करीत असताना सदरील मुख्याध्यापकाने या महिलेला जबरीने ओढत धुऱ्यावरील लिंबाच्या झाडाच्या आडोशाला नेऊन जबरी संभोग केला. या मुख्याध्यापकाने स्वतः सोबत या महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान या महिलेवर एका जबाबदार व्यक्तीने केलेल्या या बलात्काराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी मरखेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे हे करीत आहेत.