
दैनिक चालु वार्ता मोताळा/प्रतिनिधी :- जिल्हा स्मार्ट ग्राम शेलगांव बाजार येथील जि.प.मराठी प्राथमिक शाळेमध्ये प्रथमच स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता. सदर कार्यक्रमाचे अतिशय ऊत्कृष्ठ असे नियोजन हाेते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी मुलांमधील अभ्यासाव्यतिरिक्त असलेल्या सुप्त गुणांना ओळखुन त्यांना साजेसा वांव देण्याचे ऊत्कृष्ठ असे काम केले. त्या कार्यक्रमातील मुलांनी सादर केलेल्या कलागुणांची साद चांगल्या प्रकारे बघायला मिळाले. यामध्ये सदर मुलांनी नाटिका, मराठी हिंदी गिते सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच साै.सरला अमित खर्चे
प्रमुख अतिथी साै.वैषाली खर्चे शा.व्य.स.अध्यक्ष(मुले) साै.रेणुका खर्चे, शा.व्य.स.अध्यक्ष(मुली), उपसरपंच साै.दिपाली खंडारे शा.व्य.स.उपाध्यक्षा व ग्रा.पं.सदस्या, श्री.आर.एस.सुरळकर ग्रामसेवक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.