
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.. मंठा.अनाथाचा नाथ आहे एकनाथ महाराष्ट्राचा सच्चा वाघ म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना मंठा तालुका वतीने सिद्धी पीठ सबंध महाराष्ट्र मध्ये परिचित असलेले रेणुका माता मंदिर येथे महाआरती पूजा प्रार्थनेचे आयोजन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालया यश प्राप्त होऊ दे राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन होत असताना मंठा येथेही बाळासाहेबांची शिवसेना मंठा तालुका वतीने ता ९ रोजी महाआरतीच्या आयोजन करण्यात आले व रेणुका माता मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण हे करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना तालुकाध्यक्ष उदयसिंह बोराडे पाटील म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याकरिता हिंदुत्वाचे विचार धारण करून महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बजावत आहेत.त्यांनी घेतलेल्या कार्याला यश प्राप्त होऊन त्यांच्या ५९ वाढदिवसानिमित्ताने त्यांना ‘आई’ जगदंबे दीर्घायुष्य लाभू दे असे म्हणाले. यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह पाटील बोराडे, शहरप्रमुख गणेश बोराडे,गजानन कापसे,दिलीपराव हिवाळे, चांदभाई पठाण,लिंबाजी बोराडे, ॲड राजेश खरात साहेब,आकाश राऊत,रामराव वरकड,वैजनाथराव ढवळे,माऊली वरकड,गणेश बोराडे, पवन खरात,बापूराव वरकड,तुकाराम तांगडे,शंकर जाधव,शिवम उगले,अतुल इंगळे,गोपाळ गोंडगे,अंकुश थोरात, अनिल घुले,ज्ञानराज कव्हाळे व शिवसैनिक उपस्थित होते