
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे…
मंठा.
तालुक्यातील गेवराई येथे हरभऱ्याच मळणी करणाऱ्या शेतकरी महिला वंदना दामोदर गिऱ्हे (वय ३५ )मळणी यंत्र मध्ये गुंतून मृत्यू झाला सविस्तर वृत्त असे की गेवराई वेडोळी शिवारा लागत ज्ञानेश्वर खंडेराव खरात यांच्या शेतामध्ये ता.१० दु.२:१५ च्या दरम्यान हे दुखत घटना घडली करण्याचे काम सुरू असताना स्कार्फ गुंतल्याने डोके मळणी यंत्र मध्ये ओढले गेले यंत्राचा जबर मार लागल्याने वंदना गीर्हे यांचा जागीच मृत्यू झाला. उत्तरीय तपास पंचनामा मंठा पोलीस वतीने करण्यात आला असून डॉ अमर मोरे ग्रामीण रुग्णालयामध्ये मंठा यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात शवदिले असून मंठा पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने आकस्मित मृत्यू नोंद केली असून अधिक तपास म.पो.रजाळे करित आहेत.या घटनेमुळे गेवराई गाव मंठा तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.