
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील मंगरूळ येथील युवक शेतकरी कृष्णा आसाराम मगर यांनी (ता ९) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. सदर फिर्यादी यांचा लहान भाऊ कृष्णा मगर यांने गट क्रमांक १४३ शेत शिवारामध्ये विषारी औषध प्राशन केले असता उपचाराकरिता मंठा ग्रा.रू.आनले असताना जालना येथे नेत असतांना वाटेत मयत झाला असल्याची मंठा पोलीस ठाणे येऊन खबर दिली असता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या आदेशावरून अधिक तपास रजाळे करित आहेत.