
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा.अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाकडून तहसील कार्यालयात पेशकार सौ. के. एस धुमाळ यांना निवेदन दिले निवेदनात असे म्हटले आहे की रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची निर्घृण हत्या आणि राज्यात ठिकठिकाणी पत्रकांरावर होत असलेले हल्ले आणि खोटे गुन्हे दाखल होत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की वरील विषयी आपणास कळविण्यात येते की, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची निर्घृण हत्या आणि राज्यात ठिकठिकाणी पत्रकांरावर होत असलेले हल्ले आणि खोटे गुन्हे दाखल होत आहेत सदरील बाब ही लज्जास्पद आहे राज्यात अराजकता वाढत आहे. त्यामुळे पत्रकारामध्ये दहशत निर्माण झाली आहे त्यांच्या जीवीत्याला धोका निर्माण झाला आहे.
तरी आपणास विनंती की, सदरील घटनेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि राज्य शासनाने या बाबीकडे वैयक्तीक लक्ष देवून आरोपीस तात्काळ अटक करुन त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करावा.
या निवेदनावर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी, कृष्णा भावसार, राजेश भुतेकर, दिनेश जोशी, हाफे बागवान, रंजीत बोराडे, तुकाराम मुळे, केशव येउळ अदी पत्रकारांच्या साह्या आहेत.