
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पेठवडज :- कंधार तालुक्यातील व नांदेड जिल्हातील पेठवडज येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील व्यवहार ग्राहकांना पाहण्यासाठी कोण केंव्हा येतात, गरीब लोक लाईन लावूनच व्यवहार करतात व राजकीय पुढारी यांना बारी किंवा लाईन नसते ते डायरेक्ट आतमध्ये जाऊन आपले काम करून जातात हे सर्व प्रकार पाहण्यासाठी सी.सि.टि.व्ही.कॅमेरे, कर्मचारी केव्हा येतात ते कळण्यासाठी बायोमेट्रिक मशीन व प्रिंटर दोन महिने झाले खराब झाले असून खात्यात जमा पैसे किती आहेत व किती उचलायचे ते समजत नाही.सबंधीत अधिकारी कर्मचारी प्रिंटर खराब झाले आहे असे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत त्यामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन देऊन श्री.व्यंकटी जाधव, श्री.गजानन जाधव, श्री.कंधारे पांडुरंग सर्व सामाजिक कार्यकर्ते पेठवडज यांनी सि.सी.टि.व्ही कॅमेरे बसवून व प्रिंटर चालू करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे.