दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी )परमपूजनीय गोळवलकर गुरूजी विद्यालयात मातृ – पितृ दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष देगांवकर दमन, प्रमुख वक्त्या सुरशेटवार उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. पद्य विद्यालयातील विद्यार्थिनी सानवी नरवाडे व जिज्ञासा बोडके हिने गायले. प्रास्ताविक पांचारे यांनी सादर केले.
यानंतर सुरशेटवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्रभू श्रीराम ,श्रावण बाळ व भक्त पुंडलिक यांच्या गोष्टी सांगितल्या. साक्षात परमेश्वर आपल्या दारात येवून उभा आहे तरी भक्त पुंडलिक मात्र आपल्या आई वडीलांच्या सेवेत मग्न असतो.अशी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना आई-वडिलांचे महत्त्व सांगीतले.शेवटी अध्यक्षीय समारोपात दमन देगांवकर यांनी विद्यार्थ्यांना मातृ – पितृ दिन का साजरा केला पाहीजे हे सांगीतले.आपल्या सगळ्यांनाच व्हॅलेन्टाईन डे चे विस्मरण व्हावे व आपल्या जन्मदाता असलेले माता- पिता यांचे स्मरण राहावे म्हणून आपण हा दिवस साजरा करतो असे सांगीतले.याप्रसंगी सर्व वर्गातून माता आणि पिता पालकांना आमंत्रित करून विद्यालयात त्याचे पाल्याच्याहस्ते पूजन करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आई व वडिलांना प्रदक्षिणा घालून नमस्कार करून त्यांचा आशिर्वाद घेतला.शेवटी कुलकर्णी यांनी उपस्थित सर्व पालकांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तोटावार सुरेखा यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
