
दैनिक चालु वार्ता पेठवडज प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
पेठवडज :- मौजे पेठवडज ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसमृध्दी मातोश्री पांदन रस्त्यासाठी काही समस्या उद्भवत आहेत.त्याकरीता जळबा गंगाराम डावकोरे यांच्या मुलगा गणेश जळबा डावकोरे कौडंण(बांधकाम) या ठिकाणी दिनांक १६/०२/२०२३ रोज गुरुवारी सकाळी ठीक १०:०० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन कैलास शेटवाड माजी सरपंच पेठवडज यांनी केले आहे, तेव्हा तळागाळातील सर्व शेतकऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.