
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी- राम कराळे
अंतेश्वर उच्च पातळी बंधारा अंतेश्वर ता. लोहा, जि. नांदेड या बंधाऱ्यातून दि.16-02-2023 वाऱ गुरुवार रोजी सकाळी ठीक 09.00 वाजता गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे तरी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाऊ नये तसेच आपली शेतीचे साहित्य, विद्युत मोटर पंप पाईप स्टार्टर वायर गुरे तराफे वाले व इतर महत्वाची साहित्य नदीपात्रात ठेवू नये किंवा त्याचे नियोजन दि.15.2.2023 रोजी करावे अंतेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग नांदेड येथील विष्णुपुरी बंधाऱ्यात होणारा असून नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे असे पाटबंधारे विभागामार्फत कळविण्यात आले आहे