
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते लातूर (उदगीर )
विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ला घडवलं पाहिजे कारण त्यातूनच यशाचे धुमारे फुटत असतात.असे उद्गार भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांना संबोधित करतांना काढले. प्रथमतः विद्यालयाच्या प्रांगणात स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात रघुकुल मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी शालांत परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यी, वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षेत व क्रीडा प्रकारात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकरराव वट्टमवार होते. प्रमूख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्वजीवनातले प्रतिकूल अनुभव सांगून आपण हार न मानता परिस्थितीला कसे बेधडकपणे सामोरे जाऊन यश मिळविले. हे सांगून विद्यार्थ्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून,आईवडिलांचे कष्ट नजरेसमोर ठेवून यश संपादन केले पाहिजे.असे सांगून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी संस्थेचा परिचय करून देतांना म्हटले की ,भारतीय विचारांचा प्रसार होऊन समाजातून जबाबदार नागरिक घडावे.या हेतुनेच संस्थेची स्थापना झाली असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात मधुकरराव वट्टमवार यांनी लातूरच्या शैक्षणिक पॅटर्न ची सुरुवातच उदगीरच्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयातून झाली असल्याचे प्रतिपादन केले.
लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा पालकांसहीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच विद्यालयातील गुणवंत शिक्षकांना सन्मानीत केले.उदगीर ते अयोध्या सायकल वारी करणारे विष्णू तेलंग, लोणावळा या ठिकाणी राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतलेल्या नीता मोरे,दहावी प्रमूख म्हणून यशस्वी विभाग सांभाळलेले रामेश्वर मलशेट्टे व लक्ष्मी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनिलकुमार फाउंडेशनच्या वतीने विश्वजीत गायकवाड यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस दिले तर गटशिक्षणाधिकारी शेख शेफी यांनी हिंदी विषयात प्रथम आलेला विद्यार्थ्यांला बक्षीस दिले. व्यासपीठावर स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे, गटशिक्षणाधिकारी शेख शेफी, ॲडं.शिवाजीराव बिराजदार,सतनप्पा हुरदळे, षण्मुखानंद मठपती , डॉ.प्रकाश येरमे मुख्याध्यापक अनंतराम कोपले, अंकुश मिरगुडे श्रीपाद सिमंतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी चव्हाण,स्वागत परिचय किरण नेमट, निकाल वाचन रामेश्वर मलशेट्टे, संतोष कोले, वैयक्तिक गीत बालाजी पडलवार ,आभार अनंतराम कोपले तर कार्यक्रमाची सांगता मंगेश मुळी यांनी म्हटलेल्या कल्याणमंञानी झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक कृष्णा मारावार, राजकुमार म्हेञे,माधव मठवाले यासहीत लाल बहादूर शास्ञी संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.