ठाणे-प्रतिनिधी नागेश पवार
दिवा – दाटीवाटी च्या दिवा या शहरात आले दिवस चोरी च्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रात्रीच्या अंधारात तर चोऱ्या होतच होत्या परंतु काल तर चक्क सायंकाळच्या सुमारास छट पूजे निमित्त सह कुटुंब पूजा करण्यासाठी तलावावर गेलेल्या संजय चौहान रा.श्लोक नगर, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा यांच्या घरातून दिवसा ढवळ्या चोरीची घटना घडली.
मुलीचे लग्न जमले असून तिच्या लग्नासाठी आम्ही आमच्या आयुष्यभराची तडजोड एकत्र केली होती. ईमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या चौहान कुटुंबीय घराला टाळा लावून पूजेला गेले असता चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करत ४.५० लाख रुपयांची रोकड तसेच ६ तोळे सोने व जवळपास ५० तोळे पर्यंत चांदी असा एकूण १२ लाख रुपये (अंदाजे) चा ऐवज लंपास केला असल्याने लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या कुटुंबियांवर आता मोठं संकट ओढवलं असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून पुढील कार्यवाही सुरू आहे.


