
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सातारा. पारगांव-खंडाळा गावचे सुपुत्र आणि राज्यस्तरीय पत्रकार म्हणून परिचय असणारे दीपक जी गिरीगोसावी यांचे रविवारी सकाळी बाराच्या सुमारास आकस्मित निधंन झाले. त्यांच्या निधनाची बातमी संपूर्ण सातारा,पुणे,सागली सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पसरताच राजकीय तसेच धार्मिक पोलीस प्रशासन तसेच गोसावी समाजावर शोककळा निर्माण झाली. दीपक गिरीगोसावी यांनी आपल्या पत्रकार क्षेत्रामध्ये कधीच कोणाशी वादग्रस्त व वरपणा आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ठरवू दिला नाही. त्यामुळे खंडाळ्यातच नव्हे तर संपूर्ण ते राज्यभर आणि राज्यस्तरीय पत्रकार म्हणून त्यांचा चांगलाच परिचय झाला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जिल्ह्यांमध्ये अनेक प्रतिनिधी कार्यरत होते. त्यांच्या अचानक जाण्यांमुळे त्यांच्या गिरी कुटुंबीयांसह संपूर्ण गोसावी समाजाला चांगलाच धक्का बसला. त्यांच्या निधनांमुळे पत्रकार क्षेत्रातून राजकीय वर्तुळ तसेच धार्मिक विविध संस्थांतून पारगांव-खंडाळा ग्रामस्थ यांच्यातून हळहळ व्यक्त होत आहे. सातारा जिल्ह्यांचे विद्यमान प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांना त्यांच्या निधनांची बातमी समजताच त्यांनी दीपक गिरीगोसावी यांच्या निवासस्थानी आपल्या पुरीगोसावी कुटुंबासमवेत दाखल झाले. यावेळी प्रतिनिधी पुरीगोसावी यांनी सोशल मीडियावरून दीपक गिरी हा एक गोसावी समाजाचा आधारस्तंभ आणि राज्यस्तरीय पत्रकार आज हरपला असे म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला.