
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर:जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, धर्माबाद या सीमाभागातील नागरिकांनी प्रश्न सुटत नसल्याने शेजारील तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राज्य शासनाने या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी दि. ५ जानेवारीला बैठकीचे आयोजन केले होते. परंतु पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बैठक रद्द करण्यात आली. आता येत्या १५ दिवसांच्या आत बैठक घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी उपविभागीयआत बैठक घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. सीमाभागातील बिलोली, देगलूर, धर्माबाद, किनवट, माहूर या तालुक्यांतील नागरिकांना तेलंगणातील योजनांची भुरळ पडली आहे. सीमाभागात असल्यामुळे समस्या सुटत नसल्याची त्यांची भावना झाली होती. त्यामुळे तेलंगणात जाण्याचा इच्छा व्यक्त केली होती. तसेच सीमाभागात अभियानही सुरू केले होते. त्यानंतर राज्य शासनाने सीमावर्ती भागातील नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने
सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी ५ जानेवारीला बैठक ठेवण्यात आली होती. परंतु ही बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे आता दि. १५ फेब्रुवारीपर्यंत सीमावर्ती भागातील सामाजिक संघटना, पदाधिकारी, एनजीओ, नागरिकांची बैठक घेऊन समस्यांची यादी आणि त्यावरील उपाययोजना याबाबतचा अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.