
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर;दिनांक 31.01.2023 रोजी मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर . सचिन सांगळे उपनिरीक्षक श्रीकांत मोरे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देवून गौरव केला. तसेच अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार व श्री. डॉ. खंडेराव धरणे यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले. दरम्यान अधिकारी वर्गाने आपल्या चांगली कामगिरीमुळे आपले नाव कमावले आहे. त्यांचा कौतुक त्यांचे कौतुक करणे प्रत्येकाचे कर्तव्य असलेपाहिजे. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची भान ठेवत अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केले नाही. त्यामुळे सर्व स्तरातून नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची वाहवा केली जात आहे, अशी चर्चा आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अधिकारी वर्गाचे कौतुक केले.