
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर/प्रतिनिधी
देगलूर शहरातील बौद्ध स्मशान भूमी चे लोकार्पण अतिशय थाटामाटात करण्यात आले पण त्या बौद्ध स्मशानभूमीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार करण्यात आले नाही अंदाजपत्रक तयार करीत असताना देगलूर शहरातील बौद्ध समाज बांधवांची संख्या लक्षात घेऊन दोन शववाहिनी बसविण्याची गरज होती पण गुत्तेदारांनी स्थानिक नगरपालिकेच्या प्रशासनास आणि सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून जुनी एकच शिवदाहिनी , रंगरंगोटी करून बसविली शिवदाहिनी बसविली तसेच जुन्या स्मशानभूमीचे शवधाहिनी आणि पत्राची शेड कोणी विकून खाल्ले हा कळायला मार्ग नाही जवळपास एकच बौद्ध स्मशानभूमीचा आराखडा तयार करताना वेळोवेळी त्या आराखड्याची किंमत वाढविण्यात येऊन त्यास बौद्ध स्मशानभूमीची अंदाजपत्रक जवळपास दोन ते तीन कोटी रुपयांच्या घरात नेऊन सोडून हवा तेवढा मलिदा लाटला
आज घडीला शहरात दोन बौद्ध बांधवांचा मृत्यू झाल्यास त्यांची अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन-तीन कोटी रुपये खर्च करून देखील दोघांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी शवधाहीनी नाही त्यामुळे एका प्रेताचे शरीर उघड्यावर लाकडं लावून जाळावी लागत आहे ही समाजाची शोकांतिका आहे तसेच स्थानिक लोकउर्जा वृत्तपत्रात यासंबंधी बोगस कामाची बातमी प्रकाशित होऊन देखील प्रशासनाने जाणून बुझुण कानाडोळा केला त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात जातील जातीने लक्ष घालून तत्कालीन सत्ताधारी, मुख्याधिकारी अंदाजपत्रक बनविणारा अभियंता बिले उचलायसाठी सह्या करणारा अकाउंटंट या सर्वांची चौकशी करून यांच्यावर समाजाची फसवणूक करून शासनाचे करोडो रुपये थातूरमातूर कामे करून बिले उचलण्याचा गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय समिती गठीत करून योग्य ती चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे भीम प्रहारचे संस्थापक अध्यक्ष विकास नरबागे यांनी दिले.