
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी पुरीगोसावी .
सातारा जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून एका युवकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वाई तालुक्यांतील खानापूर परखंदी येथे घडली आहे. यामध्ये अभिषेक रमेश जाधव (वय वर्ष २० रा. खानापूर ता. वाई ) असे या खून झालेल्या युवकांचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन मुलीचे दुसऱ्या समाजातील मुलाबरोबर मागील तीन वर्षापासून प्रेम संबंध होते नातेवाईकांनी व भावांने संबंधित मुलाला याबाबत समजावून सांगितले होते मात्र या दोघांचे प्रेम संबंधात कोठेही दुरावा आढळून आला नाही या कारणांतून चिडून जावून मुलीच्या भावानेच मित्राच्या मदतीने अभिषेकचा अखेर परखंदीच्या माळावर काटा काढला. परखंदी गावातील काही नागरिक शेताकडे जात असताना त्यांना एका युवकांचा मृतदेह आढळून आल्यांने त्यांनी ही बाब तत्काळ याबाबत वाई पोलिसांना सांगितली यावेळी वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ .शितल जानवे-खराडे यांच्यासह पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे पो.उपनि स्नेहल सोमदे ,सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, भुईंज पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व वाई डीबी पथकांचे विजय शिर्के यांच्या सर्व टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली त्यांनी घटनास्थळी पंचनामा करताना काही कागदपत्रावरुन युवक खानापूर येथील असल्यांचे स्पष्ट झाले. त्यानंतर तत्काळ मृतदेह शविच्छेदनांसाठी सातारा येथे पाठविण्यांत आला प्राथमिक माहितीनुसार युवकांचा खून हा प्रेम प्रकरणातून झाल्यांचे शक्यता वर्तवण्यांत आली असून. या घटनेमुळे खानापूरांत प्रचंड तणावांचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यांत आला आहे. अद्याप या खून प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न झाले नाहीत या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यांत झाली असून.भुईज पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे अधिक तपास करीत आहेत.