
दैनिक चालु वार्ता म्हसळा- रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
राष्ट्रसेविका जिल्हा समितीतर्फे संपूर्ण जिल्ह्याचे भव्य पथसंचलन आणि प्रबोधन बैठक रवीवार दि.५ फेब्रु.२०२३ रोजी सायं ४ ते ६.३० वाजता डॉ.सी.डी.देशमुख कन्या शाळा,मंगलवाडी रोहा येथे होणार आहे.यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील महीला मंडळ,बचतगट माहिला प्रतिनिधीनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्ह्या कार्यवाह रुचि काळे आणि रोह्याच्या स्थानिक कार्यवाह अरूंधती पेंडसे यानी केले आहे.राष्ट्रसेविका समितीच्या लक्ष्मीबाई केळकर (माहेरच्या कमल दाते) या राष्ट्रसेविका समिती नावाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका होत्या.समितीच्या वतीने त्यांनी पाळणाघरे,शिशुमंदिरे,आरोग्य केंद्रे,कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम इत्यादी उपक्रम सुरू केले.राष्ट्रसेविका समिती ही भारतातील पाहिली हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी महिला संघटना आहे.लक्ष्मीबाई केळकर यांच्या पुढाकाराने २५ ऑक्टोबर १९३६ रोजी समिती स्थापन करण्यात आली.अखंड ८८ वर्षे कार्यरत असणारी एकमेव सर्वात मोठी अखिल भारतीय हिंदू स्त्री संघटना आहे.महिलांनी केवळ शिक्षित नव्हे तर सक्षम बनावे मानसिक, शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनावे हा दृष्टिकोन समोर ठेवून लक्ष्मीबाई केळकर यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली.राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजविणे हा राष्ट्रसेविका समितीचा मुख्य उद्देश आहे.रोह्यातील आयोजीत पथसंचलनाचा प्रमुख मार्ग डॉ.सी.डी.देशमुख विद्यालय- राम मारूती चौक- आडवी बाजारपेठ- छत्रपती संभाजी महाराज चौक – रोहा नगरपालिका- खंडोबा मंदिर-कल्पक सोसायटी-मेहेंदळेहायस्कूल डॉ.सी.डी.देशमुख विद्यालय असा असणार असल्याचे अरुंधती पेंडसे यांनी कळविले आहे.