
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे .
दि 04 जाने 23 (भोसरी )
उद्योगात कामगार हा घटक प्रमुख मानला जातो तो तंदुरुस्त राहिला तरच उद्योगातील उत्पादन क्षमता वाढते याचे गार्भीय ओळखून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भोसरीतील डायनोमर्क कंपनीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीरामध्ये 130 कामगारांनी सहभाग नोंदवला, कामगारांना धनुर्वात (टी.टी.) इंजेक्शन तसेच हाडाची ठिसुळता, मधुमेहाची तपासणी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी सांगितले कि आम्हाला ज्या ज्या आस्थापनांनी शिबिराची मागणीची नोंद आमच्या कल्याण मंडळाकडे केली आहे , त्या त्या आस्थापनाच्या ठिकाणी जाऊन आम्ही मंडळाचे सहाय्यक आयुक्त समाधान भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर घेत असतो. यापुढे संपर्क साधण्याचे त्यांनी आव्हान केले. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठे कवी संमेलन मिरजला 24 ते 25 फेब्रुवारीला होत आहे कामगारांनी सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.
यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले की ,”सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य होय” निरोगी शरीर हाच खरा दागिना आहे, कामगारांनी निरोगी राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे ,आपल्या आरोग्या ची काळजी आपणच घेतली पाहिजे, त्याचबरोबर बरोबरच कामगार कल्याण मंडळ भजन स्पर्धा, शिष्यवृत्ती योजना, क्रीडा शिष्यवृत्ती ,विविध पुरस्कार नाट्य स्पर्धा, कबड्डी स्पर्धा ,बरोबरच अनेक कामगार कल्याणकारी योजना राबवित आहे आणि कामगारांनी सहभागी होण्याचे आण्णा जोगदंड यांनी आवाहन केले, सर्व कामगारांचे आरोग्य शिबिरचे आयोजन केल्यामुळे जोगदंड यांनी मंडळाचे आभार मानले.
सुर्यकांत मुळे यांनी कामगार कल्याण योजनाचा कामगारांनी फायदा करून घेण्याचे आव्हान केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी मनुष्यबळ प्रमुख सूर्यकांत मुळे, गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, पंडीत वनसकर, कंपनीचे मुख्य कार्यकारी आधिकारी किशोर राऊत, यांचे सहकार्य मिळाल्याचे केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी सांगितले.
यावेळी शिबिरामध्ये लोकमान्य हॉस्पिटल चे डॉ संजय साळुंखे, डॉ जयवंत श्रीखंडे, डॉ आदित्य देशमुख,आण्णा जोगदंड, सी.ई.ओ. प्रकाश अभ्यंकर, व्यवस्थापक हेमंत नेमाडे, हनुमंत जाधव, वनिता कडाळे,ज्योती नवदगिरे, शितल मंडलिक, सुर्यकांत मुळे, सोमनाथ वाघ, सचिन शेळके, सचिन सदाफुले, यानी परीश्रम घेतले.