
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा. शहरातील अहेमदपुरा lभागातील एक घर फोडून चोरट्यांनी ६२ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी दुपारी मंठा शहरात घडली.
मंठा शहरातील अहेमदपुरा भागातील गुलाबखा पठाण यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून बुधवारी दुपारी चोरट्यांनी घरफोडी केली. घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले ६२ हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी गुलाब खॉ पठाण यांच्या तक्रारीवरून मंठा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोनि. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक ढवळे हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संजय देशमुख संपर्क साधला असता तपास चालू असल्याचे सांगितले आहे.