
दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी.
९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथील आचार्य विनोबा भावे सभा मंडपात रंगलेल्या परीसंवादात *कृषिजीवनातील अस्थिरता आणि लेखक* याविषयावर विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. अध्यक्ष शेषराव मोहिते लातूर हे होते., सहभागी वक्ती.प्रसिद्द लेखक श्रीकांत पाटील घुणकी,कोल्हापूर, विजय चोरमारे मुंबई, श्री विजय जावंधिया नागपूर, श्री दत्तात्रय पवार कर्नाटक, श्री कैलास इंगळे औरंगाबाद .यांनी सहभाग नोंदवला.या परिसंवादातील कृषीजीवनातील अस्थीरता आणि लेखक या विषयावर बोलताना पाटील यांनी ,आपण जगाचा पोसिंदा म्हणतो ,त्या बळीराजाच्या व्यथा आणि वेदना साहित्यात मांडणे गरजेचे आहे. कारण त्या शेतकऱ्यांचे कष्ट करण्याचे हात कधी थांबत नाहीत म्हणून तर आपण आज सुखाने चार घास खात असतो.लाॅकडाऊन च्या काळात सगळे थांबले होते मात्र बळीराजा कधी घरी बसला नाही.सतत तो राबत असतो .पण त्याच्या पिकाला मात्रं योग्य भाव मिळत नाही एक खंत आहे.त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे ही अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.परिसंवादांचे अध्यक्ष शेषराव मोहीते यांनी आपले प्रखड मत व्यक्त केले.
सूत्रसंचालक सुरेश नखाते
यांनी केले.
तसेच सदर संमेलनास कोल्हापूर ,सांगली जिल्हयातील प्रसिद्द गझलकार सिराज शिकलगार आंधळी,मा.ग..गुरव सर, अशोक पवार कडेगांव यांची कविकट्टा या कविसंमेलन मध्ये निवड झाल्या होत्या.त्यांनी आपल्या बहारदार कविता सादरीकरण करून संमेलनात रंगत आणली होती.