
दैनिक चालु वार्ता नवनाथ डिगोळे -चाकुर प्रतिनिधी
शिक्षक व विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणिला उजाळा
चाकूर येथील जगत् जागृती विद्यामंदिराच्या प्रांगणात तब्बल 43 वर्षांनी इयत्ता दहावीच्या वर्गातील 1979 मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा पार पडला असून या मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मागील आठवणीला उजाळा दिला देऊन शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
रविवारी जगत् जागृती विद्या मंदिराच्या प्रांगणात 1979 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी येथे शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा स्नेह मित्र मिलन अर्थात गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या थाटामाटात व उत्साहाच्या वातारणात साजरा करण्यात आला. यावेळी या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे तत्कालीन अनेक शिक्षक वृंद उपस्थित असल्याचे दिसून आले. यामध्ये प्रमुख्याने माजी मुख्याध्यापक भोसले सर , सावंत सर, उस्तुर्गे सर ,कुलकर्णी सर ,ढोबळे सर, इंद्राळे सर ,धोंडगे सर , मिरकले सर , शेटे सर , आलापूरे सर ,मोरगे सर , मुंडे सर , जोशी सर , बारुळे सर , भाटे सर , शेरखाने सर , बिरादार मॅडम , खंडागळे मॅडम यांच्यासह महेबुबअली सय्यद व बाबुराव केराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रगीतासाठी तत्कालीन क्रीडाशिक्षक मुंडे सरांनी ऑर्डर दिल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनातील परिपाठाचा प्रसंग आठवल्याचे दिसून आले. तसेच जे शिक्षक आणि विद्यार्थी हयात नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी भोसले सर , सावंत सर ,कुलकर्णी सर , इंद्राळे सर , धोंडगे सरांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. दिलीप माने , गोविंद झांबरे , सतीश निलंगेकर, अशोक माने , वैजनाथ मस्के,विठ्ठल शास्त्री ,अनवर पटेल ,उमाकांत झांबरे, वामन जाधव ,रमेश घुगे , अंगद कवठे , माधव गोरे , भागवत हैदराबादे, बालाजी शिंदे ,मोहम्मद सय्यद , हणमंत नाकाडे यांनी शाळेच्या आठवणी पुन्हा एकदा जागृत केल्या .तर याच बॅचमधील विद्यार्थी तथा शास्त्रज्ञ एकनाथ चाकूरकर यांचा संदेशही सर्वांना ऐकविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दिलीप महालिंगे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्नेह मित्र मिलन कार्यक्रमाची भूमिका विशद करून सर्व गुरुजनांना चरण स्पर्श करून नमन केले. प्रा.डॉ.राजेश तगडपल्लेवार यांनी सुत्रसंचलन तर आभार संभाजी सोनटक्के यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अनिल वाडकर , शिवमाला पाटील ,प्राचार्य डॉ. दिलीप माने ,संभाजी सोनटक्के ,हावगीराज ढोबळे , राजेश्वर सगरे , हणमंत नाकाडे , बालाजी धोंडगे , शिवराज शेटे यांनी पुढाकार घेतला.सर्व गुरुजनांचा संयोजन समितीच्यावतीने सन्मानचिन्ह , शाल व बुके देवून सत्कार करण्यात आला .तसेच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.तसेच या बॕचमधील विद्यार्थी तथा औरंगाबाद येथील विवेकानंद महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा.दिलीप महालिंगे हे २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे प्रा.महालिंगे यांचा सत्कार भोसले सरांच्या हस्ते करण्यात आला