
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड – महाराष्ट्र हि साधु संताच्या पावन पदपर्शाने पावन झालेली भुमी असुन याच महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात जास्त संत महात्मे होऊन गेले आजही या साधु संत माहत्म्यांनी घालुन देलेले नेम सप्ताह आजही वयोवृद्ध व युवा पिढी मोठ्या उत्साहात करत आहेत यामध्ये लोहा तालुक्यातील आडगाव येथे संत मोतिराम महाराजांचा नेम शिवजयंतीच्या पावन पर्वावर आठ दिवसीय भव्य दिव्य किर्तन महोत्सव चालु असुन या अखंड हरीनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मंडळींच्या किर्तनाचे आयोजन तसेच गांवकरी मंडळींच्या वतीने भव्य भागवत कथा व अन्नदान चालु असुन या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता रविवारी होत असुन सकाळी १० वाजता श्री ह भ प माऊली महाराज सिंदगीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे .
लोहा तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या काल्याच्या किर्तनाला हजेरी ( उपस्थितीती ) लावावी असे आव्हान सप्ताह संयोजन समिती व समस्त गावकरी मंडळी आडगावच्या वतीने करण्यात आले आहे.