
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर व धारदार लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्याना न्याय मिळवून देणारा निर्भिड व निःपक्ष पत्रकार म्हणुन बाळासाहेब बुध्दे यांच्या नावाची गणना केली जाते.विषय कोणत्याही प्रकारचा असला तरी तो हाताळण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी जन्म: असल्यामुळे समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन निःपक्ष पातीपणे व सत्याची बाजू मांडून राजकीय पुढारी, नेते मंडळी, प्रशासनातील अधिकारी वर्ग अशा भल्याभल्यांना सळो कि पळो करून सोडणारे एकमेव परीसरातील बहू चर्चेतील नाव म्हणून बाळासाहेबांचा उल्लेख केला जातो.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर सर्वच महापुरुषांच्या मानवतावादी, व पुरोगामी विचारांची पेरणी करून बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी खुप अभ्यासपूर्वक आणि परिश्रमपूर्वक मोलाचे योगदान दिले आहे. पत्रकारिते मधून त्यांनी धम्म प्रसारक म्हणून केलेले कार्य बहुमूल्य व अविस्मरणीय ठरत आहे.एक निर्भिड आणि वास्तववादी पत्रकारिता निभावून समाजातील अंधश्रद्धा व दांभिकता यावरही वेळोवेळी परखडपणे आपल्या लेखनातून मते मांडली आहेत.
पत्रकारितेल नावारूपाला आलेले व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब शेषराव बुध्दे. यांचा जन्म लोहा तालुक्यातील मौजे बेरळी (खुर्द) येथे दि.१० फेब्रुवारी १९८८ रोजी एका लहानशा खेड्यात सामान्य कुटुंबात झाला.शिक्षण पदवी पर्यंत झाले.बालपणापासुनच त्यांच्या वर बुध्द, बसवेश्वर, फुले,शिव, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारांवर प्रेरीत होवून समाजासाठी विषेश कार्य करण्याचे मनात ठरवले होते.शालेय जीवनातील मित्र आणि एक महत्वाचे पात्र.फुले, शाहू, आंबेडकरी विचारसरनी आत्मसाद करुन जोपासणारे.साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी असणारे.
सर्वांच्या सुख-दु:खात धाऊण जाणारे मित्रांचे मित्र आणि शत्रुलाही आपला मित्र बनवणारे शांत, संयमी, अभ्यासू वृत्तीने बाळासाहेब बुध्दे यांना विविध विषयांचे वाचन करणे, लिखाण करणे, विविध खेळ खेळणे, पोहणे,पक्षी मित्र,वृक्षमित्र,निसर्ग मित्र , प्राणीमात्रा वर दया दाखवणे आदी छेंद जडत जाऊन त्यांची आवड निर्माण झाली होती समाजासाठी काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा मनात विचार होता त्याचे प्रत्येक्षात रूपांतर त्यांनी तरूण वयातच ११ वेळा रक्तदान, नेत्रदान, अवयव दान करून समाजातील तरुण युवकांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
लोहा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ३६१ जवळ असलेलं बेरळी (खुर्द) हे त्यांच गावं २००० व्या शतकाच्या प्रारंभिक काळात, प्रतिकुल परिस्थितीमध्ये असताना शालेय जीवनापासूनच स्वतःच्या पायांवर फोटोग्राफी व्यवसायाकडे वळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. फोटोग्राफी या आवडत्या व्यवसायातून पत्रकारितेच्या क्षेत्राकडे आकर्षीत केले.आधुनिक व रंगीत फोटोग्राफी छपाईच्या दिशेने झेप घेणार्या वृत्तपत्रांच्या दिशेने वाटचाल करत अनेक छोटया-मोठया वृत्तपत्रात फोटोग्राफर,वार्ताहर नंतर माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती लोहा तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम करत आहेत. समाजप्रबोधन, विविध जनसमस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी प्राधान्याने केले.
ग्रामीण भागात पत्रकारिता करीत असताना परिसरातील विविध मूलभूत सुविधा तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी तसेच जनसामान्य व शेतकऱ्यांचे प्रश्न मग ते अतिवृष्टी असो अथवा पीक विम्याचा प्रलंबित विषय पत्रकारिताच्या माध्यमातून न्याय व मदत मिळवून देण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो; आणि त्यामुळेच आजही त्यांचे तालुक्यात व परिसरात त्यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. पत्रकार म्हणजे फ़क्त एक बातम्या व जाहिरातींसाठी प्रयत्न करणारा व्यक्ती नसून एक समाजाचा आरसा आहे. समाजहितासाठी काय योग्य हे दाखवून देणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांच्या विचारातून नेहमी स्पष्ट होत असते. समाजनिष्ठ व लोकोपयोगी पत्रकार म्हणून त्यांचेकडे नेहमीच पाहिले जाते.
प्रगत समाजाचा ध्यास घेवून आपल्या समाजहितैषी कार्याचा वसा अखंड चालविलेले युवा निर्भिड पत्रकार बाळासाहेब बुध्दे यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक अपुरेच आहे. फोटोग्राफी ते पत्रकारिता, अपारंपारीक उद्योगाचा वारसा, साहित्यिक घौडदौड, सहकार, आणि समाजहितैषी जनसेवा असा त्यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच भगवंता चरणी प्रार्थना व मंगलमय हार्दिक शुभेच्छा.
गोविंद पाटील पवार
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड