
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
किनवट : तालुक्यातील अतिदुर्गम सिंदगी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्कृष्ट कार्य करणारे मुख्याध्यापक सदानंद अचकुलवार. यांना भाजपा तालुका उपाध्यक्ष बबन वानखेडे यांनी ” शिक्षकरत्न सिंदगी ” हा पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
तालुका मुख्यालयापासून २६ किमी अंतरावर डोंगरदरीत वसलेल्या सिंदगी (मोहपूर) येथील जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्यानंतर श्री अचकुलवार यांनी शालेय वर्ग खोल्यांची अंतर्गत बाह्य आकर्षक रंगरंगोटी केली. तसेच पालापाचोळा कचऱ्यापासून कंपोष्ट खताची निर्मिती केली असून त्याच्याच वापराने आता गांडूळखत निर्मिती उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. शाळेत विविध वृक्ष लागवड व लॉन तयार करून आकर्षक गार्डन तयार केली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत त्यांनी विकसित केलेल्या परसबागेस नुकतेच तालुका स्तरीय द्वितीय परितोषीक प्राप्त झाले आहे.
जि.प.प्रा. शाळा सिंदगी (मो.) येथे चिमुकल्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून आयोजिलेल्या केंद्रस्तरीय सांस्कृतीक कला स्पर्धा महोत्सवात त्यांना गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, ग्रामसेवक प्रवीण रावळे, विस्तार अधिकारी ( शिक्षण) मनीषा बडगिरे, केंद्र प्रमुख पद्माकर कवटीकवार, रमेश खुपसे, भाजपा तालुकाध्यक्ष बबन वानखेडे यांचे हस्ते “शिक्षकरत्न सिंदगी” हा बहुमान देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी माजी पं.स.सदस्य प्रेमसिंग नाईक , सरपंच तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष परमेश्वर खोकले, उपसरपंच दत्ता चिकने, ग्राम पंचायत सदस्य रूपेश पाटील, पोलीस पाटील बालाजी वानखेडे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राहूल उमरे, सदस्य सुरेश वानखेडे, केंद्रिय मुख्याध्यापक राजेश्वर जोशी, शरद कुरूंदकर, चंद्रशेखर सर्पे, रुपेश मुनेश्वर, वासुदेव राजूरकर, राहूल तामगाडगे, गड्डमवाड, रविंद्र चौधरी , कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.