
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- मौजे गुंडा ता. कंधार जि.नांदेड येथील श्री नागोबा देवस्थान मंदिर नागबर्डी संस्थान गुंडा येथे डी पी डी सी योजनेअंतर्गत सिंगल फेज २५ केव्हीए विद्युत रोहित्र व वाढीव पोल मंजूर करून श्री नागोबा देवस्थान मंदिर नागबर्डी संस्थान गुंडा येथील समस्त गावकरी मंडळी यांनी श्री प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांची भेट घेऊन खा.श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्याकडे गावकऱ्यांनी विजेची मागणी केली.त्याची दखल घेऊन खासदार साहेबांनी नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन नागबर्डी संस्थान मौजे गुंडा ता.कंधार जि.नांदेड येथे डी.पी.डी.सी.योजनेअंतर्गत सिंगल फेज २५ केव्हीए विद्युत रोहित्र व वाढीव पोल मंजूर करून सहकार्य करावे अशी मागणी खा. श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे.