
दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी (श)(वर्धा): राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी ग्रामीण रुग्णालयात आष्टी येथे आरोग्य निदान,उपचार व रक्तदान शिबिर तथा रुग्णांना फळवाटप करून साजरा करण्यात आला यावेळी भाजप तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर यांनी आरोग्य शिबिराचे तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख रुपेश बोबडे यांनी रक्तदान शिबिराचे फीत कापून उद्घाटन केले. या वेळी शिबिराला भाजपचे तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, लीडकॉम चे माजी अध्यक्ष अशोक विजयकर, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. प्रीती पराडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्शिया शेख, युवासेना उपाजिल्हा प्रमुख सुरज पिटेकर, धरम पथरे,अश्फाक शेख, शुभांगी अजमिरे, गुलशन अग्रवाल, भाजपा युवा मोर्चाचे प्रज्वल चोहटकर, स्वराज शिरभाते, भावेश म्हात्रे, सौरभ कदम आदींची उपस्थिती होती शिबिरातील उपस्थितांना कमलाकर निंभोरकर, रुपेश बोबडे,अशोक विजयकर, सुरज पिटेकर यांनी मार्गदर्शन करून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रीती पराडकर संचालन प्रकाश इंगळे यांनी तर आभार डॉ.राऊत यांनी मानले याप्रसंगी तालुक्यातील भाजपा,शिवसेना(शिंदे गट)यांच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती