
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : – शिवणी जा येथील ग्रंथालय शाळेच्या दारी उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असुन जनसेवा सार्वजनिक वाचनालयामध्ये ग्रंथालय शाळेच्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला.
वाचनालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली या उपक्रमास विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिला यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनापासून वाचनाचे आवड निर्माण व्हावी तसेच त्या माध्यमातून त्यांचा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासनाने ग्रंथालय शाळेच्या दारी उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे.
सदरील उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांच्या पत्रानुसार जिल्हा परिषद शाळा जामगा शिवनी येथे या उपक्रमाचे शाळेमध्ये ग्रंथालय शाळेच्या दारीच्या उपक्रमातून वीस विद्यार्थ्यांना मोफत वर्गणीदार सभासद करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर गावकरी प्रतिष्ठीत नागरिक सिताराम पा जामगे , कोंडीबा जामगे , हारी पा जागे कल्याण पा जामगे , शाळेतील शिक्षक कर्मचारी यांची या उपक्रमास प्रमुख उपस्थिती होती.