
दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले
अहमद्पुर: तालुक्यातील थोडगा येथे गेल्या 50 वर्षा पासून अखंड हरीनाम केला जातो.या वर्षी पण अखंड हरीनाम सप्ताह आणी भागवत कथा ज्ञान यज्ञा च आयोजन सर्व गावकर्याच्या वतीने करण्यात आले होते .या भक्तिमय आणी हरीनाम सप्ताहनिमित्त गावातील माहेरवाशिणीना आग्रहाच निमंत्रण असत . आम आदमी पार्टीचे गडचिरोली युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पोले यांच्या पत्नी सौ.शालिनी नामदेव पोले यानी गावाकऱ्यांना आम्हाला महाप्रसाद आणी भागवत आरती करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली गावकर्यानी विनंतीला दुजोरा दिला आणी युवा नेते नामदेव बाबुराव पोले (सुमठाणकर) यांनी सहपत्निक महा आरती केली .त्या प्रसंगी परिसरातील भाविक भक्त ,संतमंडळी, भागवतःचार्य, भजनी मंडळी,वादकवृंद आणी गावातील सर्व नागरिक या महा आरती आणी महाप्रसादाला उपस्तिथ होते.