
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी- शहाबाज मुजावर.
पन्हाळा : वाघवे येथील ग्रामदेवतेच्या पुजाऱ्याने पत्र्याच्या शेडमधील लोखंडी ॲगलला नॅायलॅानच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. विजय रामचंद्र गुरव (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. घटनेची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.
पन्हाळा पोलीस आणि घटनास्थळारुन मिळालेली माहिती अशी, विजय गुरव वाघवे गावातील ग्रामदेवता हनुमानाचे पुजारी होते. मनमिळावू आणि हसतखेळत जीवन जगणारे गुरव गेल्या दोन महिन्यापासून नैराश्य अवस्थेसारखे राहणीमान होते.गुरुवारी रात्री जेवण करून झोपले होते;परंतू शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान राहत्या घराच्या पाठिमागील शेडेत विजय गुरव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांना दिसले.या घटनेची वर्दी युवराज पाटील यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात दिली.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सुन असा परिवार आहे.