
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- तालुक्यातील आष्टा गावातील गटारे, नाल्या तुडूंब भरल्या आहेत. परिणामी सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्याच रस्त्यावरून लहान मुले , वृद्ध, ग्रामस्थांचे येणे जाणे असते. याच घाणीमध्ये कुत्रे, मांजर, घुस, उंदीर फिरत असून, पूर्ण घाण रस्त्यावर दिसून येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या घाणीमुळे दुर्गंधी होऊन डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या घाणीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तरी संबंधित प्रशासन, अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन गावातील नाल्यांची साफसफाई करावी. अनेक गल्ली मध्ये गटार तुडुंब भरलेल्या असून, मारूती मंदिर समोर मोठ्या प्रमाणात घाणीचे पाणी वाहात आहे. या सांडपाण्याचा प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.