
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
: आज दिनांक ११ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या( संभाजीनगर) औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. डॉ. गोऱ्हे उद्या दुपारी अडीच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात विद्यार्थ्यांना ‘विधिमंडळातील आयुधे, विधेयके’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
यानंतर दुपारी चार वाजता काही खाजगी भेटीनंतर त्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोलीस अधिकारी आणि संबंधितांशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहेत.
यानंतर सायंकाळी सहा वाजता त्या विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
यानंतर शहरातील काही महत्त्वाच्या व्यक्तींची त्या भेट घेणार आहेत.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी त्या शनिशिंगणापूर शिर्डी मार्गे पुण्याकडे रवाना होणार आहेत.