
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या प्रात्याक्षिक परीक्षांना शुक्रवार पासून सुरुवात झाली. पहिलाच दिवस भाषा विषयांच्या प्रात्याक्षिकाचा होता. यात मराठी आणि हिंदी विषयाचे प्र्रात्याक्षिक शहरातील काही शाळांमध्ये घेण्यात येत आहेत.अनेक ठिकाणी परीक्षेत विद्यार्थी उत्तरांचा क्रम मागे-पुढे करत होते. तर अनेक ठिकाणी उत्तर विसरल्याचा प्रकार घडला. मात्र, विद्यार्थ्यांचा प्रयत्न चांगला आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.
शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या लेखी परीक्षा दोन मार्चपासून सुरू होत आहेत. त्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांसाठी घेण्यात येणारी प्रात्याक्षिक परीक्षा सुरू झाली. या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण आणि हॉलतिकीटाचे वाटप शाळांच्या वतीने अधीच वितरित करण्यात आले आहे. यंदा होणाऱ्या दहावीच्या प्रात्याक्षिक परीक्षेत गेल्या वर्षी कोरोनामुळे वगळण्यात आलेला अभ्यासक्रम पूर्वत ठेवण्यात आला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची सवलत आता परीक्षेत राहणार नाही. त्यामुळे नियमित नियमांनुसाच ही परीक्षा घेतली जाणार आहे.
यंदा बहुतांश विद्यार्थी थेट दहावीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी चलबिचल मनस्थिती दिसून येत आहे. शुक्रवारी प्रात्याक्षिक परीक्षेचा पहिलाच दिवस होता. बाह्य परीक्षांच्या निरीक्षणात मराठी, हिंदी या भाषा विषयाचे २० गुणांचे प्रात्याक्षिक घेण्यात आले. ज्यात पाच गुण श्रवण कौशल्य, मौखिकसाठी, पाच गुण हे भाषण आणि दहा गुण हे स्वाध्याय, विचार प्रकट करण्यासाठी अशी विभागणी करण्यात आलेली आहे.