
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी-शहाबाज मुजावर.
साळवण गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा वनक्षेत्रामध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरात काही इसम वनक्षेत्रात शस्त्रा सहित शिकारीच्या उद्देशाने फिरताना दिसून आले. त्यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले. चौकशी अंती त्यांनी मौजे नरवेली गावच्या जंगल हद्दीत विनापरवाना शिकारीच्या उद्देशाने अपप्रवेश केल्याचे मान्य केले. यातील दोन संशयित आरोपी समवेत दोघांचा या गुन्ह्यात प्रथम दर्शनी समावेश आहे.
त्यानुसार आरोपींना वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा 1972 व भारतीय वन अधिनियम 1927 अनवये अटक केली असून, या गुन्ह्यासाठी प्रथम वर्ग न्याय दंडाकारी कोल्हापूर यांनी आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी ( फॉरेस्ट कस्टडी) सुनावली आहे. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने राखीव वनक्षेत्रात विनापरवाना शस्त्रासहित घुसने तानाजी विष्णू पाटील वय 42, विनायक दत्तात्रय लाड वय 35 सर्जेराव शिवाजी पाटील वय 27 दौलू ज्ञानू कांबळे वय 73 आरोपींना चांगलेच महागात पडले आहे.सदर गुन्ह्यात पुढील चौकशी करून अधिकचे धागे दोरे हाती लागणेची शक्यता निर्माण झाली आहे.
चौकट:
वन विभाग,कोल्हापूर यांचे मार्फत जाहीर आवाहन करण्यात येते की, वन्य पशु, पक्षी पाळणे, हाताळणे, विक्री करणे ,त्यांची शिकार करणे इ. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अनव्ये कायद्याने गुन्हा आहे. याबाबत माहिती मिळताच तात्काळ 1926(हॅलो फॉरेस्ट) या टोल फ्रि क्रमांकावर तसेच जवळच्या वन विभाग कार्यालयात संपर्क साधावा.
वरील कार्यवाही जी. गुरुप्रसाद उपवन संरक्षक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली प्रतीक्षा काळे वनसंरक्षक, अविनाश तायनाक वनपाल , बी.एल. कोळी वनपाल गगनबावडा, राजेंद्र उलपे, मनीषा ऱ्हायकर वनसंरक्षक नरवेली, नितीन शिंदे, ओंकार भोसले, रईसा मुल्ला, प्रकाश खाडे, यांचे मार्फत करणेत आली तसेच पोलीस पाटील व सरपंच नरवेली यांची मदत लाभली.